सोशल मीडियावर २ लाख फॉलोअर्स असलेला रील स्टार निघाला पिस्तूल विक्रेता !

Foto

जटवाडा रोडवर गुन्हे शाखेची कारवाई
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) :
सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या एका रील स्टारचा गुन्हेगारी जगताशी असलेला थेट संबंध उघडकीस आला आहे. हसूल जटवाडा परिसरात गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एका टोळीचा व्यवहार पूर्ण होण्यापूर्वीच गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. शुक्रवारी (दि.७) घडलेल्या या कारवाईत पोलिसांनी एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ताब्यात घेतलेल्या चौघांपैकी एक जण इंजिनिअर असून, तो सोशल मीडियावर तब्बल २ लाख फॉलोअर्स असलेला रील स्टार आहे. उमर दुर्राणी असे रील स्टारचे नाव आहे. त्याने हे शस्त्र 'मकोका'तील आरोपीकडून खरेदी केल्याचे समोर आले असून, या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अर्जुन कदम आणि त्यांचे पथक गस्तीवर असताना जटवाडा रोडवर काही तरुण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. सईदा कॉलनीत सापळा रचण्यात आला. पोलिसांनी संशयितरीत्या थांबलेल्या शेख शकील आणि सय्यद अल्फाज यांना ताब्यात घेतले. त्यांची झाडाझडती
'मकोका'तील आरोपीकडून खरेदी !
▶ हे पिस्तूल दुर्राणी याने शहरात अमली पदाथांचे (नशा) सिंडिकेट चालवणाऱ्या आणि सध्या 'मकोका' अंतर्गत हसूल मध्यवर्ती कारागृहात असलेल्या अश्फाक पटेल याच्याकडून ६० हजार रुपयांत खरेदी केले होते. स्वतः प्रयत्न करूनही विक्री करता न आल्याने, त्याने हे काम शेख शकील आणि शेख अबू नासेर यांच्यावर सोपवले होते. पकडलले गेले तेव्हा संशयितांपैकी एकाच्या कंबरेला हे पिस्तूल लावलेले आढळले.
घेतली असता, त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळून आली. हे पिस्तूल त्यांना शेख अबू नासेर आणि उमर दुर्राणी यांनी विक्रीसाठी दिल्याचे समोर आले. उर्वरित दोन्ही साथीदारांनाही बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलिस उपनिरीक्षक अर्जुन कदम, राजेंद्र साळुंखे, योगेश गुप्ता, श्रीकांत काळे, मनोहर गिते, मनोहर त्रिभुवन आणि विक्रम खंडागळे यांच्या पथकाने केली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions